Kardelwadi School l वर्षाच्या 365 दिवस चालणारी ही अनोखी शाळा | Sakal Media

2022-02-16 1

Kardelwadi School l वर्षाच्या 365 दिवस चालणारी ही अनोखी शाळा | Sakal Media

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडी गावा मधली ही एक अनोखी शाळा आहे जी वर्षातून एक ही दिवस बंद नसते. एवढच काय तर या शाळेत चक्क आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिलं जातंय. कर्डेलवाडी च्या शिक्षण पॅटर्न ची थेट एनसीईआरटी ने ही दखल घेतली आहे.

२००१ मध्ये दत्तात्रय सकट आणि बेबीनंदा सकट या शिक्षक दांपत्यानी या शाळेत शिकवायला सुरु केलं आणि शाळेचा चेहराच बदलला...पहिली ते चौथीपर्यंत चालणारी ही शाळा एक राज्यात वेगळा आदर्श ठरत आहे. ही शाळा वर्षाचे 365 दिवस चालते तसेच या शाळेतील विद्यार्थी शनिवार रविवार तसेच सण उत्सवाच्या काळातही उपस्थित राहतात. इतकेच नाही तर विद्यार्थांना देखील या शाळेचा लळा लागला आहे..राज्यातील डिजिटल शिक्षण देणारी ही पहिली शाळा असून याची अंबलबजवणी नंतर राज्यभरात केली गेली. या जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्लंड सारख्या पाश्चिमात्य देशांचे आधुनिक दर्जाचे शिक्षण दिले जातंय. या शाळेची दखल नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण व संशोधन परिषदेने घेतली असून या परिषदेचे 25 ते 30 शिक्षण तज्ञांचे पथक महिनाभर येथील शैक्षणिक स्थितीचा व उपक्रमांचा अभ्यास करणार आहे,त्यामुळे यापुढच्या काळात शिक्षण क्षेत्रात काय बदल व सुधारणा करायच्या याचा अभ्यास केला जाणार आहे. या शाळेला आता पर्यंत जवळपास 350 पेक्षा जास्तचे पुरस्कार मिळाले आहेत.